Please enable Javascript...

विवाह एक सुवर्ण बंधन | Blog | Royal Marathas
Android Application
Media Partner

विवाह एक सुवर्ण बंधन

विवाह एक सुवर्ण बंधन

लग्न म्हणजे एका पवित्र वातावरणामध्ये अग्नीच्या, ब्राह्मणाच्या, मित्रमंडळीच्या, नातेवाईकंच्या साक्षिणी दोन माणस आयुष्यभरा साठी एकमेकांना जोडली जातात. हातात हात देऊन आयुष्यःभर एकमेकांना साथ देण्याचं वचन देतात आणि आयुष्यभर ते वचनपाळण्यासाठी प्रयत्न करतात, विवाह म्हणजे एक सुवर्ण बंधन!!!

हा! लग्न म्हंटल कि मर्यादा आल्या जवाबदार्या आल्या , फक्त नवरा आणि बायको वरच नाही तर दोन्ही परिवारावर. मुलांच्या आई-वडिलांच्या, सासू-सासरांच्या परंतु ह्या सर्व जवाबदार्या घेऊन संपूर्ण आयुष्य हसत-खेळत प्रेमासोबत घालवणे हेच या नात्याचे सौंदर्य आहे.

आजच्या काळात नात्याला महत्व तेच आहे, पण नात जोडण्याच्या पद्धतीमध्ये थोडासा फरक पडला आहे. पूर्वी नातेवाईकंच्या ओळखीने, वडीलधारी माणसांच्या, संपूर्णकुटुंबाच्या सहमतीने मुलगा किवां मुलगी पसंत केली जायची. आजचे युग इंटरनेटचे युग आहे ह्या युगामध्ये लग्नासारख्या पवित्र नाते जोडण्या साठी वधू-वर सूचक संस्था किवां मैट्रीमोनिअल साईट यांची मदत घेतली जाते,

जरी नाती जोडण्याची पद्धत बदलली तरी नात्यातील प्रेम आणि गोडवा तसाच कायम राहतो म्हणूनच विवाहाला एक पवित्र आणि सुवर्ण बंधन म्हंटले जाते!!!!