Please enable Javascript...

मराठी सांस्कृतिक विवाहा आधीचे विधी | Blog | Royal Marathas
Android Application
Media Partner

मराठी सांस्कृतिक विवाहा आधीचे विधी

मराठी सांस्कृतिक विवाहा आधीचे विधी

मराठी समाजातील  विवाह हे त्याच्या विविध आणि विशेष विधीसाठी प्रसिद्ध आहे! ह्या विधी परंपरेपासून पासून चालत आल्या आहेत !! ह्या विधींमध्ये दोन कुटुंब व त्यांचे नातेवाईक एकत्र येऊन लग्नासारख आतुट नात जोडतात. आपल्या नवीन आयुष्याची सुरवात या गोड व मजेशीर विधि होणार याची दोन्ही कुटुंबांना खूप उत्सुकता असते

प्रत्येक विधिचे एक विशेष वैशिष्ट्य आणि क्रम आहेत ,

लग्नापूर्वीच्या विधिंचा क्रम :

साखरपुडा : साखरपुडा हा एक विवाहसोहळा आहे ज्यात वराचे कुटुंबीय वधूला साडी आणि साखर (मिठाई) देतात ज्याला स्वीकृतीचे चिन्ह मानले जाते. नवीन जोडी कडून अंगठीची  देवाणघेवाण केली जाते.

केळवणं  / गडगनेर :

या सोहळ्यामध्ये लग्न होणाऱ्या वधूचे किंवा वरचे नातेवाईक , वधू किंवा वर यांना सहकुटुंब जेवणाच्या कार्यक्रमाला बोलावतात व त्यांना त्यांच्या पुढील वाट चाली साठी आशीर्वाद आणि भेटवस्तू देतात 

हळद :

हळद हा लाग्नापुर्वीचा एक अतिशय आनंद दायक आणि गमती शीर सोहळा आहे, या विधी मध्ये आंब्याची पाने हळदी मध्ये बुडवून वधू आणि वराच्या शरीरावर लावली जातात, आपल्या हिंदू शास्त्रात हळदीला भरपूर महत्व आहे , हळदी मध्ये बरेच गुण आहेत त्यातला आपल्या ला माहीत असलेला गुण म्हणजे औषधी गुण ज्यामुळे वर आणि वधू ला हळद लावल्याने त्यांच्या त्वचे वर आणि शरीरावर असलेले संसर्ग बरे होतात तसेच चेहर्‍यावर आणि त्वचेत एक वेगळे तेज येते.

अश्या प्रकारे लग्ना पूर्वीचे सर्व विधी पूर्ण करून लग्नाच्या विधीची तयारी केली जाते!!